डोंगरगाव येथील शेतक-याची विश प्राशन करून आत्महत्या

एकाच दिवशी दोन आत्महत्येने हादरला परिसर

बहुगुणी डेस्क, वणी: आमलोन येथील शेतक-याच्या आत्महत्येच्या घटनेची शाई वाळत नाही तोपर्यंत संध्याकाळी झरी तालुक्यात आणखी एका शेतक-याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. डोंगरगाव येथील रहिवासी असलेले बाबाराव विठ्ठल डोहे (53) असे मृतकाचे नाव असून त्यांनी राहत्या घरी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.

बाबाराव डोहे हे डोंगरगाव येथील रहिवासी होते. त्यांच्याकडे 8 एकर शेती आहे. मंगळवारी दिनांक 19 डिसेंबर रोजी बाबाराव यांच्या पत्नी शेतात कामाला गेल्या होत्या. संध्याकाळी त्या घरी परत आल्या. तेव्हा त्यांना बाबाराव हे फरशीवर पडून दिसले. त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत असल्याचे आढळल्याने त्यांनी विश प्राशन केल्याचे त्यांना कळले.

त्यांनी शेजा-यांना बोलवून बाबाराव यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मुकुटबन पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

एकाच दिवशी दोन आत्महत्या
मंगळवारी मध्यरात्री आमलोन येथील शेतकरी आनंद मेश्राम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर 24 तास व्हायच्या आधीच डोंगरगाव येथील घटना उघडकीस आली. एकाच दिवशी दोन आत्महत्याच्या घटना समोर आल्याने परिसर हादरून गेला आहे.

Comments are closed.