घोन्सा फाटा येथे रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

महसूल विभागाची कारवाई, एक ब्रास रेती जप्त

रमेश तांबे, वणी: तालुक्यातील घोन्सा फाटा येथे आज अवैध रित्या रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला. सदर ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती आढळून आली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रेती, ट्रॅक्टर व ट्रॉली असा 5 लाखांचा  मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की आज मंगळवारी दिनांक 7 डिसेंबर रोजी डीबी प्रमुख शिवाजी टिपुर्णे हे पथकासह पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान मुकुटबन रोडवरील घोन्सा फाट्याजवळ सकाळी 7 वाजताच्या सुमारास एक ट्रॅक्टर (MH29 BP8830) हे विना नंबर प्लेटच्या ट्रॉलीसह जाताना आढळून आले. डीबी पथकाने चालकास थांबवून सदर ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यात एक ब्रास रेती आढळून आली.

रेतीबाबत ट्रॅक्टर चालकाला विचारणा केली असता सदर रेतीची विना परवाना वाहतूक होत असल्याचे आढळून आले. तलाठी सुनील उराडे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक दामोधर दादाजी ईखारे रा. छोरीया ले आऊट वचालक लक्ष्मण दादाजी सोयाम (25) राहणार कायर त्यांच्यावर भादंविच्या कलम 379 व 34 तसेच 1986 च्या पर्यावरण (संरक्षण) अधिनियम नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

या प्रकरणी एक ब्रास रेती ज्याची किंमत 5 हजार रुपये, ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण 5 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोउपनि शिवाजी टिपुर्णे करीत आहे.

हे देखील वाचा:

शहरातील अर्ध्या रस्त्यांवर ‘ऑटो’ व ‘ट्रॅव्हल्स’चा ताबा

मिलन लुथरियांचा बहुचर्चीत तडप सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला…

 

Comments are closed.