दुचाकीस्वाराची उभ्या ट्रकला धडक, गंभीर जखमी

जखमीला उपचारासाठी चंद्रपूर येथे केले रेफर

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथून काम आटोपून घरी परतत असताना एका दुचाकीस्वाराने रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना शनिवार, 9 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास बुरांडा (ख) कृषी विद्यालयाजवळ घडली.

जखमी व्यक्तीचे नाव नारायण दौलत मुंगोले (वय 55, रा. हटवांजरी, ता. मारेगाव) असे आहे. नारायण हे शेतातील फवारणीचे औषध घेण्यासाठी हटवांजरी येथून मारेगावला गेले होते. औषध घेऊन गावाकडे परतत असताना बुरांडा (ख) स्टॉपजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या अपघातात नारायण गंभीर जखमी झाले. रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी तात्काळ त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवले. सदर अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

Comments are closed.