ड्युटी संपवून घरी परतणा-या व्यक्तीचा गणेशपूर जवळ अपघात

खड्यात दुचाकी गेल्याने तोल जाऊन अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: गणेशपूर ते कोसारा दरम्यान एका इसमाची दुचाकी खड्डात पडून तो त्यात गंभीर जखमी झाला. आज संध्याकाळी ही घटना घडली. दिगंबर उमरे असे जखमीचे नाव असून तो हा मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील रहिवाशी आहे. जखमीला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. आजचा दिवस हा अपघाताचा ठरला.  

सविस्तर वृत्त असे की दिगंबर उमरे (45) हा मुकुटबन येथील एका खासगी कंपनीत कामाला आहे. कामानिमित्त तो कोलगाव वरून मुकुटबन येथे रोज येणे जाणे करतो. आज शुक्रवारी दिनांक 3 डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास तो ड्युटी संपवून त्याच्या मोपेडने घरी परतत होता. गणेशपूर ते कोसारा मार्गावर असलेल्या एका खड्यात त्यांच्या दुचाकीचे चाक  गेले. त्यामुळे तोल जाऊन ते खाली पडले.

खाली कोसळल्याने त्यांच्या तोंडाला मार लागला व ते जागीच बेशुद्ध झाले. रस्त्यावरून जाणा-या लोकांना ही बाब कळली. कोसारा येथील एका शिक्षकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र दिगंबरची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे.

आजचा दिवस ठरला अपघाताचा
आज दुपारी वणीतील गुंजच्या मारोतीजवळ एका दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर पत्रिका वाटून परतणा-या एका इसमाला बुरांड्याजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या तो गंभीर जखमी झाला.

दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.

हे देखील वाचा:

संविधान चौकात भीषण अपघात, दोघे जागीच ठार

पत्रिका वाटण्यासाठी आलेल्या इसमाचा बुरांड्याजवळ अपघात

मिलन लुथरियांचा बहुचर्चीत तडप सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला…

Comments are closed.