एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या गाडीला अपघात

चालक गंभीर, तर एसडीपीओ जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: वणी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वाहनाला सोमवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान वडकी जवळील सावंगी जवळ भीषण अपघात झाला. यात चालक परेश मानकर हे गंभीर जखमी झाले असून पुज्जलवार हे जखमी झाले आहे. या अपघातात गाडीला मोठे नुकसान झाले.

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार, संजय पुज्जलवार हे सोमवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी यवतमाळ येथे एका बैठकीला गेले होते. मिटिंग आटपून ते रात्री कारने (MH12 RY7287) राळेगाव मार्गे वणीत परत येत होते. 8.30 वाजताच्या दरम्यान वडकी जवळील सावंगी टर्निंगजवळ वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक परेश मानकर हे गंभीर जखमी  झाले तर संजय पुज्जलवार हे जखमी झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली. बचावकार्याला सुरुवात झाली. दोघेही जखमींना यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रकऱणाचा तपास राळेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.