बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील एका तरुणीवर नदीजवळील वीट भट्ट्याजवळ अत्याचार करणाऱ्या संशयिताच्या वणी पोलिसांनी मानकी शिवारातून मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी घटना घडल्यापासून पसार होता. राजू पोटे (अंदाजे 47) असे संशयीताचे नाव आहे. तो वणीतील खरबडा परिसरात राहतो. त्याचे क्रिमिनल बॅकग्राउंड असल्याची माहिती असून या जगतात तो कटर नावाने कुप्रसिद्ध आहे. दिवसाढवळ्या ही लाजिरवाणी व गंभीर घटना घडल्याने पोलिसांवर आरोपीचा शोध लावण्याकरिता प्रचंड दबाव वाढला होता. अखेर एका आठवड्यानंतर आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.
पीडिता (18) ही वणीतील रहिवासी आहे. ती वागदरा जवळील गांधीनगर येथील वीट भट्ट्याजवळ विटांचे तुकडे गोळा करण्यासाठी गेली होती. तिथे आरोपीने तिला बळजबरीने झुडुपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने घटा उघडकीस येताच वणी शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा छडा लावण्याचा दबाव पोलिसांवर होता. पोलिसांनी आपली सर्व यंत्रणा कामाला लावली होती. मिळालेल्या टीववरून ते संशयीताचा मागोवा घेत होते.
ओळख लपवण्यासाठी काढली दाढी
दरम्यान पोलिसांना खबरीकडून संशयीत राजू उर्फ कटर पोटे हा बेपत्ता असल्याचे कळले. पोलिसांनी पीडितेला संशयीताचे वर्णन सांगितल्यावर ते मिळते जुळते होते. दुसरी बाब म्हणजे घटना झाली तेव्हा त्याची दाढी वाढलेली होती. मात्र घटने नंतर त्याने वागदरा येथील एका सलूनमध्ये जाऊन दाढी काढली होती. अचानक दाढी काढल्याने पोलिसांचा संशय आणखीनच बळावला.
मानकी शेतशिवारात असल्याची टीप
गेल्या एक आठवड्यापासून पोलीस कटरचा शोध घेत होते. मात्र कटर हा पोलिसांना सतत हुलकावणी देत होता. अखेर तो मानकी शिवारात दडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून आज दुपारी पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी फिल्डिंग लावली. दरम्यान त्यांना तिथे राजू आढळला. पोलिसांचा फौजफाटा दिसताच कटरने तिथून पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याला सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला गजाआड केले.
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे व ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख एपीआय धीरज गुल्हाने, डीबी पथक व वणी पोलीस पथकाने केली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती असल्याने घटना उघडकीस



Comments are closed.