आदिवासी जनसेवक वामनराव सिडाम यांचा अमृत महोत्सव
मान्यवरांच्या उपस्थितीत झाला सपत्निक सत्कार
अयाज शेख, पांढरकवडा: आदिवासी जनसेवक वामनराव सिडाम यांचा अमृत महोत्सव साजरा झाला. त्यांच्या 75 व्या वाढदिवसाला त्यांच्या चाहत्यांनी सदिच्छा दिल्यात. माॅं जगदंबा मंगल कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रम झाला. वामनराव सिडाम त्यांच्या पत्नी कमल सिडाम यांचे सत्कार करण्यात आले. सामाजिक तथा राजकीय दीर्घआयुष्यासाठी शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.
कार्यक्रमाला माजी मंत्री शिवाजीराव मोघे, खासदार बाळासाहेब धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार बापूराव राठोड, जितेंद्र मोघे, वैशाली नहाते, नरेश गेडाम, गजानन बेजकीवार, शंकर बडे, भाऊराव मरापे, अमर पाटील, विजय पाटील, मनोज भोयर, अंकित नैताम, दत्ताजी मालगडे, जसविंदरसिंग सोखी, किरण तोडासे उपस्थित होते.
कार्यक्रमानिमित्त बोलताना खासदार बाळासाहेब सुरेश धानोरकर यांनी वामनरावांचा जीवन आलेख मांडला. त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांच्या दूरदृष्टीवर चर्चा केली. अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी श्री जगदंबा संस्थान केळापूर ट्रस्ट निर्मितीचा इतिहास सांगितला. वामनराव सिडाम यांनी एका जमीनदाराशी न्यायालयात लढा कसा दिला तेही सांगितलं.
महाराष्ट्र शासनाद्वारा आदिवासीसेवक पुरस्कृत, पर्यावरण, जंगल, कामगार चळवळ, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रांत वामनराव सिडाम यांचे खूप मोठे कार्य आहे. श्री जगदंबा संस्थान केळापूर मंदिराचे ते शिल्पकार आहेत.
त्यांच्या जीवनचरित्रावर 75अमृतमहोत्सवानिमित्त गौरव विशेषांक व नागरिक सत्कार सोहळा राणी दुर्गावती कल्याणकारी मंडळ नागपूर तथा नागरी सत्कार समिती पांढरकवडा यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संचालन बंडू सोयाम यांनी केले आभार प्रदर्शन मनोज भोयर यांनी मानले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)