ठाणेदार अजीत जाधव यांची बदली

कोणाची लागणार ठाणेदारपदी वर्णी?

बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अजीत जाधव यांची अकोला येथे बदली करण्यात आली आहे. तर वणी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांची पांढरकवडा येथे बदली करण्यात आली. शिरपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पीएसआय रामेश्वर कांदुरे यांची स्थानिक गुन्हे शाखा (LCB) येथे बदली करण्यात आली आहे.

लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. ज्या अधिका-यांचा एका जिल्ह्यात 3 वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अशा अधिका-यांच्या दुस-या जिल्ह्यात बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार ही बदली करण्यात आली आहे. आता वणी पोलीस स्टेशन येथे ठाणेदारपदी कुणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कसा ठरला अजीत जाधव यांचा कार्यकाळ?
गेल्या सहा महिन्याआधीच ठाणेदार अजीत जाधव यांनी वणी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. एक शिस्तप्रिय, सुस्वभावी, कुणाच्या दबावाला बळी न पडणारे अधिकारी म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. ते आधी मुकुटबन पोलीस ठाण्यात रुजू असल्याने त्यांना वणी आणि परिसराबाबत चांगली जाण होती. त्यांच्यापुढे घरफोडी, दुचाकी चोरी याचे मोठे आव्हान होते. त्या दिशेने त्यांचे काम सुरू होते. मात्र त्यांना पुरेसा वेळ न मिळाल्याने ही समस्या जैसे थे राहिली. घरफोडीमुळे त्रस्त झालेल्या वणीकरांच्या आक्रोश मुळेच याधीच्या ठाणेदारांची बदली झाली होती, हे विशेष.

कोणाची लागणार ठाणेदारपदी वर्णी?
वणी पोलीस ठाण्याची मलईदार ठाणे म्हणून ओळख आहे. या ठिकाणी ठाणेदारपदी वर्णी लागावी यासाठी अनेक पोलीस अधिकारी फिल्डिंग लावतात. आता या ठिकाणी कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 

हे देखील वाचा: 

दारू पिल्यानंतर ‘तू मेरा भाई है’ डॉयलॉग मारल्याने मारहाण

Comments are closed.