तुळजापूर येथील अखंड ज्योतीचे आज वणीत आगमन

सं. 6.30 वा छ. शिवाजी महाराज चौक येथे भव्य स्वागत

बहुगुणी डेस्क, वणी: राज्यातील साडेतीन शक्तीपिठांतर्फे एक असलेल्या तुळजापूर येथील भवानी मातेची अखंड ज्योतचे आज वणीत आगमण होत आहे. या अखंड ज्योतीचे स्वागत सायंकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. वणीतील भाविकांनी स्वागतासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री नवशक्ती दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी केले आहे.

Podar School 2025

दरवर्षी एका शक्तिपीठातून मातेची अखंड ज्योत वणीत आणली जाते. गेल्या वर्षी माहूर येथुन रेणुका मातेची ज्योत प्रज्वलित करून वणी नगरीत आणली होती. या वर्षी नवरात्र उत्सवात तुळजापूर येथील भवानी मातेची ज्योत वणी नगरीत आणली जात आहे. ही ज्योत दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथे भक्तांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. दुर्गा माता मंदिर नवरात्र महोत्सवात 9 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांच्या सोबत दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, चंदन मोहुर्ले, नितीन बिहारी, राजकुमार अमरवानी, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदळे, अमोल बदखल सतीश कामटकर, मारुती गोखरे इत्यादी नवरात्र उत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.

Comments are closed.