भास्कर राऊत, मारेगाव: प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डी येथे जि. प. यवतमाळ यांच्या माध्यमातून मिळालेल्या रुग्णवाहिकेचा आज गुरुवारी दिनांक 8 जुलै रोजी लोकार्पण सोहळा पार पडला. खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
प्रा. आरोग्य केंद्रातील रिक्तपदे व इतर भौतिक समस्या बाबतचा आढावा खा. बाळूभाऊ धानोरकर व आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी घेतला. याशिवाय कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार ही करण्यात आला.
यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, जि. प. सदस्या अरुणा खंडाळकर, जि. प. सदस्य अनिल देरकर, कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, कांग्रेसचे जेष्ठ नेते नानाजी पाटील खंडाळकर, मारेगाव पं. समितीच्या सभापती शीतल पोटे, उपसभापती संजय आवारी, पं. समिती सदस्य धनराज कुमरे, सरपंच रविराज चंदनखेडे, मारेगाव पं. समितीचे गटविकास अधिकारी डॉ. नाल्हे, उपसरपंच प्रफुल झाडे, कांग्रेसचे मारेगाव तालुका अध्यक्ष मारोतराव गौरकार,
महिला तालुका अध्यक्षा सुप्रिया जोगी, भाजपचे महामंत्री मंगेश देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी अर्चना देठे, मार्डी प्रा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ तेजस आस्वले, डॉ. पायल पवार आदी उपस्थित होते.
या लोकार्पण सोहळ्याचे संचालन डॉ. तेजस आस्वले, तर आभार प्रदर्शन जि. प. सदस्या अरुणा खंडाळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ तेजस आस्वले, डॉ. पायल पवार, सी. एल. दोडके, साखरकर, शंकर आत्राम, पी पानघाटे, सौभडीवाल, मेश्राम, अक्षय करसे, नितीन आत्राम, सलामे, गलाट, कोकुडे, पाचभाई, पाचपोहर तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
हे देखील वाचा: