वरझडी येथे वीज कोसळून एका शेतक-याचा मृत्यू; 2 जखमी

पावसामुळे आसरा घेतलेल्या झोपडीवर कोसळली वीज

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील वरझडी (बंडा-देवी) येथील शेतशिवारात आज दि. 7 जुलै बुधवार रोजी दुपारी 3.30 वाजतच्या सुमारास एका झोपडीवर वीज कोसळली. यात एका शेतक-याचा मृत्यू झाला तर 2 महिला सहकारी जखमी झाल्या आहेत. शंकर गणपत लोनबळे (38) असे मृतकाचे नाव असून सुचिता मारोती काळे (50) व पिगलाबाई लोनबळे (50) असे सहका-यांचे नाव आहेत.

वरझडी येथे गोपालपूर शेतशिवारात शंकर यांची 4 एकर शेती आहे. आज सकाळी ते शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शंकर लोनबळे, सुचिता काळे, पिगलबाई लोनबळे हे शेतात असलेल्या झोपडीत आश्रयासाठी गेले.

मात्र काही वेळातच झोपडीच्या टिनाच्या शेडवर वीज कोसळली. यात शंकर लोनबळे यांचा जागीच मृत्यू झाला तर सुचिता काळे व पिगलाबाई लोनबळे या दोन महिला जखमी झाल्या. वीज कोसळल्याचे माहिती होताच परिसरातील शेतात काम करणा-या शेतक-यांनी शेतात धाव घेतली.

त्यांनी शंकरसह तिघांनाही वणी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र शंकर लोनबळे डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुचिता काळे व पिगलाबाई लोनबळे यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. शंकर यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत. शंकरच्या अकाली मृत्यूमुळे परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.