वणी बाजार समिती सभापती पदाची माळ ऍड. विनायक एकरे यांच्या गळ्यात

जितेंद्र कोठारी, वणी: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उप सभापती पदाची निवड बुधवार 24 मे रोजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. बाजार समिती सभागृहात झालेल्या सभेत ऍड. विनायक एकरे यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडली. तर भाजपचे विजय गारघाटे यांना उप सभापती पदावर समाधान मानावे लागले.

बाजार समितीच्या निवडणुकीत 18 संचालकांपैकी भाजप समर्थित शेतकरी एकता पॅनलचे 14 सदस्य निवडून आले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तसेच वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व कांग्रेसे नेते ऍड. विनायक एकरे यांनी शेतकरी एकता पॅनलच्या बॅनरखाली निवडणूक लढली व जिंकली ही.

निवडणूक निकालानंतर सहकार क्षेत्रात मातब्बर असलेले ऍड. एकरे यांचे नाव बाजार समिती सभापती पदासाठी पुढे आले. मात्र पक्षासाठी झटणा-या कार्यकर्त्यांना पद मिळावे, असा सूर भाजपच्या गोटातून येत होता. मात्र आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी कार्यकर्त्यांची मनधरणी केली व ऍड. विनायक एकरे यांच्या सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला.

बाजार समिती निवडणुकीत शेतकरी एकता पॅनलचे सहकारी संस्था गटातील ऍड. विनायक एकरे, नितीन पानघाटे, प्रभाकर बोढे, दिलीप बोढाले, मंगल बलकी, मोहन वरारकर, अशोक पिदूरकर, वेणूदास काळे, मीरा पोतराजे, वैशाली राजूरकर निवडून आले. ग्राम पंचायत गटातून शेतकरी एकता पॅनलचे विजय गारघाटे, प्रकाश बोबडे, चंद्रकांत हिकरे व हेमंत गौरकार यांची बाजार समिती संचालक पदी निवड झाली.

सभापती निवड सभेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, दिनकरराव पावडे, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, महेश देठे, सचिन खाडे, अशोक घुगुळ, मारोती पाचभाई, विट्ठलराव झाडे, नवनिर्वाचित सभापती ऍड. विनायक एकरे, उप सभापती विजय गारघाटे व इतर सर्व संचालक हजर होते.

Comments are closed.