झेडपी सदस्यावर हल्ला करणारा जेरबंद

घटनेपासून होता फरार

भास्कर राऊत, मारेगाव: जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर यांना मारहाण करणाऱ्या युवकाला अखेर मारेगाव पोलीसांनी अटक केली आहे. मागील 7 ते 8 दिवसांपासून तो फरार होता. जि. प. सदस्य अनिल देरकर हे आपल्या मतदार संघातील वेगाव येथे फेरफटका मारत असताना त्याच गावातील राहुल सूर याने अनिल देरकर यांच्या डोक्यात दगड मारला. त्यामुळे अनिल देरकर यांना जबर दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला 7 ते 8 टाके सुद्धा बसले. त्यांचेवर चंद्रपूर येथे उपचार करण्यात आले. घडलेल्या घटनेपासून राहुल हा फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर काल. दि. 11 नोव्हेंबरला राहुल याने स्वतःच पोलिसांपुढे सरेंडर केल्याची चर्चा आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.