बहुगुणी डेस्क, वणी: पूनर्वसनाबाबत विचारणा केली म्हणून एकाला काठीने मारहाण करण्यात आली. तालुक्यातील पिंपरी (कोलेरा) येथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दिलीप नानाजी लोडे (55) हे पिंपरी (कोलेरा) येथील रहिवासी आहे. शुक्रवारी दिनांक 25 एप्रिल रोजी स. 11.30 वाजताच्या सुमारास ते घरासमोर उभे होते. दरम्यान त्यांच्या घरासमोर आरोपी अतुल नानाजी बोंडे (47) रा. वणी हा उभा दिसला. दिलीप यांनी अतुलला जागेच्या पुनर्वसनाबाबत विचारणा केली. मात्र त्यावर अतुल भडकला. अतुलने दिलीप यांना शिविगाळ करीत बाजूला असलेल्या एकाच्या हातात असलेली काठी हिसकावली. त्यानंतर त्याने दिलीप यांच्यावर काठीने प्रहार केला. या मारहाणीत दिलीप यांच्या डोक्यावर मार लागला. घटनेनंतर दिलीप यांनी वणी पोलीस स्टेशन गाठते. त्यांनी अतुलविरोधात तक्रार दिली. मेडिकल तपासणीनंतर अतुल नानाजी बोंडे विरोधात बीएनएसच्या कलम 118 (1), 352, 351(2)(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.