पैसे परत न केल्याने मित्रानेच केला मित्राचा अमानुष खून

लोखंडी सळईने डोक्याचा चेंदामेंदा, आरोपी भु-याला 1 दिवसाचा पीसीआर

बहुगुणी डेस्क, वणी: बाकडे पेट्रोलपम्प जवळील खुनाचा छडा लागला असून दिलेले पैसे परत न केल्याने मित्रानेच मित्राचा डोक्यावर लोखंडी सळईने प्रहार करून खून केला. अशी अपडेट बाकडे पेट्रोल पम्प जवळील खुनाची अपडेट आली आहे. मल्लेश संजय नेरकुंटलावार (वय 24, रा. दामले फैल, वणी) असा मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी मंगेश उर्फ भुर्या विलास डाखरे (वय 26, रा. पळसोनी, वणी) याला वणी पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, त्याला आज एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

प्राप्त माहिती नुसार, मृतक मल्लेश व आरोपी मंगेश उर्फ भु-या हे दोघे तरुण एकमेकांचे मित्र होते. ते महाशिवरात्रीनिमित्त मध्यप्रदेश येथील पछमडी येथे फिरायला गेले होते. तेथे मल्लेशने भु-याला ₹7000 दिले ठेवण्यासाठी दिले होते. वणीला परत आल्यावर भु-या पैसे परत करणार होता. मात्र वणीला आल्यावर भु-याकडून मल्लेशने ठेवलेले पैसे खर्च झालेत. त्यामुळे तो काही पैसे परत करत नव्हता. यावरून बुधवारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी यावरून त्यांच्यात चांगलाच वाद झाला. त्यांनी एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.

रात्री काय घडलं नेमकं?
रात्री 9:30 वाजताच्या सुमारास बाकडे पेट्रोल पम्प जवळ मल्लेश आणि भु-या दोघांची गाठ पडली. तेव्हा त्यांच्यात पैशावरून पुन्हा वाद झाला. दरम्यान भु-याने लोखंडी सळईने मल्लेशवर हल्ला केला. त्याने मल्लेशच्या डोक्यात जोरदार वार केले, त्यामुळे मल्लेशच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. मारहाणीमुळे झालेली आरडा ओरड व अमानुषपणे होणारा हल्ला पाहून तिथे जवळच असलेले नागरिक तात्काळ गोळा झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यातील तिथल्या एकाने मल्लेशचा भाऊ राजेश याला मल्लेशला भु-या मारहाण करतोय याची माहिती दिली. राजेश घटनास्थळी आला. दरम्यान पोलिसांना देखील याबाबत माहिती मिळाली होती. राजेश तिथे गेला असता त्याला त्याच्या भावाच्या डोक्याचा चेंदामेंदा झालेला दिसला. त्याने भावाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

मर्डर केल्यानंतर गर्दी जमू लागली. त्यामुळे भु-या घाबरून घटनास्थळावरून फरार झाला. मात्र पोलिसांनी काही वेळातच त्याच्या मुसक्या आवळल्या. फिर्यादी राजेश यांच्या तक्रारीवरून आरोपी मंगेश उर्फ भुर्या विलास डाखरे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज (19 फेब्रुवारी) आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी (PCR) मिळाली आहे. आरोपी भु-या हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे.

सदर कारवाई एसडीपीओ सुरेश दळवे आणि ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली API प्रियंका चौधरी, कपील पाटील, दत्ता पेंडकर, PSI सुयोग महापुरे, सुदाम आसोरे, शुभम मनवर आणि वणी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास API प्रियंका चौधरी तपास करीत आहेत.

Comments are closed.