अनुसूचित जातीतील (S.C.) युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण

करा कंस्ट्रक्शन इलेक्ट्रिशिअन, अकाउंट असिस्टंट, डाटा एन्ट्री, मल्टीस्किल टेक्निशिअन कोर्स मोफत

बहुगुणी डेस्क, वणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) द्वारा अनुसूचित जातीतील युवक युवतींसाठई मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कंस्ट्रक्शन इलेक्ट्रिशिअन, अकाउंट असिस्टंट, डोमेस्टिक डाटा एन्ट्री, मल्टी स्किल टेक्निशिअन (ईलेक्ट्रिक) कोर्स मोफत करता येणार आहे. या कोर्ससाठी 10 वी पास युवक युवतींना अप्लाय करता येईल. विशेष म्हणजे उपस्थितीनुसार विद्यार्थ्यांना प्रति माह विद्यावेतन देखील मिळेल. सदर कोर्स हे निटकॉन ट्रेनिंग सेंटर, महाराष्ट्र बँक जवळ वणी येथे होत असून प्रवेशासाठी 24 मार्च ही अंतिम तारीख आहे. अवघे दोनच दिवस प्रवेशासाठी शिल्लक आहेत. त्यामुळे त्वरित संपर्क साधावा असे आवाहन निटकॉन तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहिती व प्रवेश निश्चित करण्यासाठी 9881740465, 8390557589, 9552507477 या क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये –

  • सर्व कोर्स मोफत असून ते केवळ एससी (मागासवर्गीय जाती) साठीच आहेत.
  • प्रत्येक प्रशिक्षनार्थीस प्रतिमाह 4000 रु (उपस्थितीनुसार) विद्यावेतन बार्टी तर्फे देण्यात येईल.
  • प्रशिक्षणार्थ्यांना युनिफॉर्म व बुक्स देण्यात येईल.
  • सदर कार्यक्रम अनिवासी आहे. बाहेरगावातील कुणी विद्यार्थी असल्यास त्यांना राहायची व्यवस्था करावी लागेल.
  • अनुसूचित जातीतील वयोगट 18-35 मधील गरजू व इच्छुक पात्रता धारक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज व त्या नुशांगिक कागदपत्रासह सादर करावेत.
  • प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे घटक, कालावधी, स्थान, व प्रवेशाबाबतचे सर्व अधिकार बार्टी संस्थेकडे राखीव असतील.
  • संबधीत उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह स्वःखर्चाने निवड कार्यक्रम स्थळी उपस्थित रहावे.
  • प्राप्त नामांकनांमधून समुपदेशन, मुलाखत चाचणी द्वारे होणार अंतिम निवड होणार.

कुठले डॉक्युमेंट लागणार?
१. अर्ज २. प्रतिज्ञा पत्र ३. शैक्षणिक प्रमाणपत्र ४. आधार कार्ड ५. जातीचे प्रमाणपत्र ६. टी.सी. ७. जन्म दाखला ८. अधिवास प्रमाणपत्र ९. फोटो १०. बैंक पासबुक ११. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट

प्रशिक्षण ठिकाण
२ रा माळा, श्री कृष्ण भवन, सिद्धिविनायक मचिंगसेंटर, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ वणी. ता वणी जिल्हा यवतमाळ. ४४५३०४
संपर्क – 9881740465, 8390557589, 9552507477, 9529849572

Comments are closed.