तीन तिघाडा काम बिघाडा, बांधकामावरून झाला राडा

घराच्या बांधकामावरून भगतसिंग चौकात तिघांनी एकास बदडले

विवेक तोटेवार, वणी: शहर व परिसरात अलीकडच्या काळात भांडणांची अनेक प्रकरणे येत आहेत. अगदी शुल्लक कारणावरूनही मोठं वादंग उठत असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच घराच्या बांधकामावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. ही घटना भगतसिंग चौकातील इंगोले मेडिकलजवळ घडली. याप्रकरणी वणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रंगनाथनगर, कोंडाणावाडी रवींद्र धनराज गुप्ता (30) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी महिला (60) रा. शास्त्रीनगर, विकास गजानन बोंडे (21), रा. जागृती नगर आणि प्रशांत मारोती गाडगे ( 40), रा. शास्त्रीनगर यांच्यासोबत घराच्या बांधकामावरून वाद झाला. या वादात रवींद्र गुप्ता यांना आरोपी महिलेने शिवीगाळ केली. तर विकास बोंडे याने काठी घेऊन रवींद्र यांना मारहाण केली. या मारहाणीत रवींद्र यांच्या कानाजवळ जखम झाली. प्रशांत गाडगे यांनी रवींद्र यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे तक्रारीत म्हटले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या घटनेनंतर घाबरलेल्या रवींद्र गुप्ता यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध कलम 118 (1), 115 (2), 352, 351(2), (3), 3(5) BNS अंतर्गत गुन्हे नोंदवलेत. या घटनेचा तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मारोती पाटील करीत आहेत.

Comments are closed.