बिर्याणीत गोमांसच्या संशयावरून दोन गटांत मारहाण

दोन्हीं गटातील लोकांवर गुन्हे दाखल

विवेक तोटेवार, वणी: रविवार दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी शहरातील मोमिनपुरा येथील एका बिर्याणी सेंटरमधून गोमांस असलेली बिर्याणी विकत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. कार्यकर्त्यांनी बिर्याणी सेंटरमधून पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस कारवाई सुरू असतानाच काही लोकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार संतोष तुळशीदास लकशेट्टीवार हे बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. संतोष यांना माहिती मिळाली की, मोमीनपूरा येथे गोमांस विक्री होत आहे. संतोष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सदर माहिती फोन करून पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी फोन करून सदर हॉटेल दाखविण्यासाठी बोलावले. यावेळी संतोष व त्यांचे साथीदार हे हॉटेल दाखविण्यासाठी मोमिनपुरा येथे गेलेत. ते बाहेरच उभे होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यानंतर संतोष व रोहण पारखी यांना हॉटेल मालक आहेफाज खान अजीज खान यांनी तुम्ही पोलिसांना माझे हॉटेल का दाखविले? म्हणून कॉलर पकडून मारहाण केली. यावेळी तेथे उभे असलेले आहेफाज यांच्या 14 साथीदारांनी संतोष व रोहण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आहेफाज याने त्या दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यांच्या तावडीतून कसेबसे सुटून संतोष व रोहण यांनी वणी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात हॉटेल मालकासह 14 आरोपींवर कलम 189 (2), 191 (2), 190, 115 (2), 352, 351 (2), 351 (3) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिस करीत आहे.

तर विरुद्ध गटाच्या तक्रारीवरून संतोष व त्यांच्या साथीदारांवर 351 (2), 351 (3), 189 (2), 191 (2), 190, 115 (2) नुसार गुन्हे नोंद करण्यात आला आहेत.

Comments are closed.