बहुगुणी डेस्क, वणी: भांडण कोणत्या कारणासाठी होऊ शकतं, याचा काही नेम नाही. अगदी शुल्लक कारणही मोठं वादळ उभं करू शकतं. ज्याची झळ भांडण करणाऱ्या दोन्ही व्यक्ती किंवा गटांना पोहचते. असेच एक प्रकरण तालुक्यातील मुर्धोनी येथे घडलं. ज्याची संपूर्ण गावात चर्चा सुरू आहे.
तक्रारीनुसार फिर्यादी शंकर बापुराव पिपराडे (28) हे मुर्धोनीला राहतात. त्यांच्याच शेजारी मुर्धोनीतच आरोपी देवराव पेंदोर (52) राहतात. शनिवार दिनांक 29 मार्चच्या सकाळी 08.00 वाजताच्या सुमारास स्वयंपाकाच्या इंधनावरून वाद सुरू झाला. हा वाद वाढतच गेला. मग आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ सुरू केली.
प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. तर आरोपी देवराव पेंदोरने त्याच्या हातातील लाकडी पाटीने फिर्यादी शंकर बापुराव पिपराडे यांच्या डाव्या कानावर, खांद्यावर, मांडीवर व पायावर मारहाण करून दुखापत केली. सोबतच शिवीगाळ करून धमकीही दिली. त्यानुसार आरोपीवर कलम 118 (1) 352,351(2),(3) अन्वये गुन्हे दाखल झालेत. पुढील तपास NPC अविनाश बनकर करीत आहेत.
Comments are closed.