राजूर येथे शहीद भगतसिंग जयंती साजरी

माकप व भाकपतर्फे अभिवादन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महान क्रांतीकारी, शहीद ए आझम भगतसिंग ह्यांची जयंती दिनांक २८ सप्टेंबरला राजूर येथील शहीद भगतसिंग चौकात साजरी करण्यात आली. शहीद भगतसिंग चौकातील त्यांचा प्रतिमेला गावातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करुन साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रमाला कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. नंदकिशोर लोहकरे, प्रीतम हनुमंते, विनोद इंगळे,आशिष पाटील, चैलेश आरमोरिकर, अमर चीटपल्लिवार, स्वप्नील हस्ते, माणिक खैरे, पप्पू भगत, भोला दाढे, लड्डू दुर्गमवार, पोयाम , राजू हिकरे, मास्टर हीकरे आदी गावातील तरुण उपस्थित होते.

Comments are closed.