हॉरर कॉमेडी भुलभुलय्या 2 आज सुजाता थिएटरमध्ये रिलिज

फुल्ली एसी व लक्झरीयस वातावरणात अनुभवा थ्रिल.... बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

बहुगुणी डेस्क, वणी: प्रसिद्ध हॉरर कॉमेडी मुव्ही भुलभुलय्याचा सिक्वेल आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल 15 वर्षांनंतर याचा सिक्वेल येत आहे. हा सिनेमा वणीकरांना सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड सिस्टिममध्ये बघता येणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यासह कियारा आडवाणी व तब्बू देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर राजपाल यादव व संजय मिश्रा हे विनोदी भूमिकेत दिसणार आहेत. अनिज बज्मी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाची तिकीट बुकिंग सुरू झाली आहे. 

पहिल्या भागात मंजुलिकाच्या भूताला तांत्रिकाच्या मदतीने एका बंद खोलीत कैद केले जाते. त्यानंतर 18 वर्षांनंतर ही कथा पुढे जाते. कार्तिककडे भुताखेतांशी बोलण्याची कला असते. त्यामुळे तो तांत्रिक बाबा म्हणून ओळखला जातो. पण खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा मंजुलिकाचे कैदेत असलेले भूत अचानक बाहेर येते. त्यानंतर जी धमाल होते ती प्रेक्षकांना या चित्रपटात बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा जरी हॉरर असली तरी त्याला कॉमेडीचा तडका दिला आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.