बहुगुणी डेस्क, वणी: वणी घुग्गूस मार्गावर प्रचंड रहदारी वाढली आहे. त्यातही लालगुडा चौपाटीचा चौक अत्यंत धोकादायक ठरत आहे. या भागात वारंवार अपघात होत आहेत. रविवार दिनांक 9 मार्चला सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास असाच एक अपघात घडला. एका भरदार ट्रकने मंदर येथील भास्कर जगन जिलठे (50) यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झालेत.
भास्कर जिलठे हे मंदर येथील रहिवासी असून ते पोस्टमास्टर आहेत. रविवारी ते वणीतील आठवडी बाजारात खरेदी करण्याकरिता आलेत होते. सर्व कामं आटोपल्यानंतर ते मंदरकडे निघालेत. दरम्यान लालगुडा चौपाटीवरून मंदरकडे ते वळत होते. तेव्हा एका भरधाव ट्रकने अचानक त्यांच्या मोपेडला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झालेत. त्यांचा पाय ट्रकखाली चिरडला गेला.
तिथल्या नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. तसेच ऍम्बुलन्सला माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भास्कर यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
का होत आहेत अपघात?
वणी ते घुग्घुस, भालर, सुंदरनगर, कोरपना या रोडवर कोळसा खाण व गिट्टी क्रशर आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रकची प्रचंड वर्दळीचा आहे.वणीत रेल्वे साईडिंग आहे. त्यामुळे दिवसभर शेकडो कोळशाने भरलेले ट्रक या मार्गाने धावत असतात. त्यामुळे रस्त्यांची नेहमी दुर्दशा होत राहते.तसेच वणी लगत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वसाहत वाढत आहे. त्यामुळे या मार्गावरून वसाहत व ग्रामीण भागातील वाहतुकीतही वाढ झाली आहे. ट्रकचालकाची भरधाव व अनियंत्रित ड्रायव्हिंग अशा अपघातांना कारणीभूत ठरताना दिसत आहे. तसेच इतर कारणांमुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
Comments are closed.