‘त्या’ गाड्यांचा वाली कोण?, पोलिसांपुढे प्रश्न?

अखेर न्यायालयाच्या आदेशाने 16 फेब्रुवारीला होणार लिलाव

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या अनेक दिवसांपासून जप्त केलेल्या गाड्या वणी पोलीस स्टेशनमध्ये उभ्या आहेत. तसेच 400 किलो लोखंडी भंगार देखील आहे. हे सगळं पोलीस स्टेशनच्या आवारात जमा आहे। त्यामुळे प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशाने १६ फेब्रुवारीला याचा लिलाव होणार आहे.

सन २०२१ व २०२२ मधील विविध गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेली ही वाहने आहेत. ती सध्या पोलिस स्टेशनच्या आवारात उभ्याउभ्या जंग लागून खराब होऊ लागली आहेत. ही वाहने आता भंगारात जमा होऊ लागली आहेत. त्यामुळे या दुचाकी वाहनांचा व ४०० किलो लोखंडी भंगाराचा लिलाव करण्यात येत आहे.

आरोपींनी गुन्ह्यांमध्ये वापरलेली वाहने किंवा कागदपत्र नसताना पोलिस अनेकदा वाहन जप्त करतात. यावेळी वाहनधारकांना न्यायालयात मूळ कागदपत्रे सादर करून सोडवता येतात. वाहन सोडवून न नेल्यास ती पोलिस स्टेशनमध्येच पडून राहतात.

कुणीही मालकी हक्क सिद्ध करू न शकलेल्या बेवारस वाहनांनी पोलिस स्टेशनचा आवार पूर्णपणे व्यापला आहे. तसेच लोखंडी भंगारानेही मोठी जागा व्यापली आहे. पोलिस स्टेशनच्या आवारात आता गुन्ह्यात जप्त केलेली वाहने लावण्याकरिता जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे नव्याने गुन्ह्यात जप्त केलेली वाहने कुठे ठेवायची? हा पेच पोलिसांसमोर निर्माण होऊ लागला.

पोलिस स्टेशन आवारातील ४०० किलो भंगारासह टीव्हीएस व्हिक्टर, हिरोहोंडा स्प्लेंडर, होंडा पॅशन या तीन बेवारस दुचाक्यांचाही यावेळी लिलाव करण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारीला ही लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे.

एकाच व्यक्तीचे दोन्ही घरं फोडणारी चोरट्यांची टोळी गजाआड

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.