बर्ड फ्लू आजाराची ग्रामीण जनतेत धास्ती

मुकुटबन, अडेगावसह इतर गावांत कोंबड्याचे मृत्यू

0

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यासह तालुक्यात बर्ड फ्लूची जनतेच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे चिकन सेंटरवर याचा परिणाम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बर्ड फ्लू आजार झालेल्या मोर व कोंबड्यांच्या तपासणी दिल्लीसह इतर ठिकाणी करण्यात आली आहे. त्यात पॉजिटिव्ह रिपोर्ट असल्याने मोठ मोठया हॉटेलमध्ये चिकनपासून बनणाऱ्या डिशेसवर बंदी घालण्यात आली आहे.

तालुक्यातील मुकुटबन, अडेगाव व इतर ग्रामीण भागात कोंबड्याचे अचानक मृत्यू झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. कोंबड्याचे मृत्यू बर्ड फ्लूने झाले की इतर आजाराने हे शोधणे गरजेचे झाले आहे.

टीव्ही चॅनेल व वृत्तपत्रात सतत येणाऱ्या बातम्यांमुळे जनतेला बर्ड फ्लू आजाराबाबत जनता संभ्रमात पडली आहे. या आजाराचे नाव ऐकून जनता एकदा पुन्हा चिकन सेंटरकडे पाठ फिरवीत असल्याचे दिसत आहे. आजाराच्या धास्तीने चिकन सोडून बकऱ्याचे मटण व मच्छीकडे जास्त प्रमाणात धाव पाहायला मिळत आहे.

केळापूर तालुक्यातील लिंगती येथील आठ मोरांचे रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याने हा आजार झरी तालुक्यात ही येणार या भीतीने लोकांची गर्दी चिकन सेंटरवर कमी होताना दिसत आहे. यापूर्वी कोरोना आजार चिकनमुळेच होत असल्याचे सांगून संपूर्ण जगात कोंबडे व अंडी यांचा नाश करणे सुरू होते.

आता पुन्हा बर्ड फ्लू आजार आल्याने कोंबडे व इतर पक्षी मरणे सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना व बर्ड फ्लूमुळे कोंबडीचे चिकन विक्री करणाऱ्या धंदे चालकांवर मोठा परिणाम झाला आहे.

हेदेखील वाचा

कांतिलाल जोबनपुत्रा यांचे निधन

हेदेखील वाचा

क्रिकेट सट्टा-मटका धाड प्रकरणी आरोपींचा पाय खोलातच

Leave A Reply

Your email address will not be published.