मारेगाव तालुक्यात मटका, जुगारसह अवैध धंद्याना उत

भास्कर राऊत, मारेगाव : मारेगाव तालुक्यात सूरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे. अन्यथा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मारेगाव तालुका भाजपातर्फे मारेगाव पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. .

मारेगाव तालुक्यात सध्या अवैध धंद्याना उत आलेला आहे. तालुक्यातील अनेक गावामध्ये जुगार, वरली मटका मोठया प्रमाणात सुरु आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी मारेगाव पोलिस स्टेशन हद्दीतून सुरु आहे. तसेच या अवैध धंदेवाल्यांची नागरिकांसोबत अरेरावी सुद्धा वाढली आहे. मारेगाव तालुक्यातील मोठया गावासह लहान गावामध्येही मटका, जुगार, अवैध दारू विक्री असे धंदे हातपाय पसरवत आहे. यावर्षी सततच्या पावसाने शेतकरी मेटाकुटीला आलेला असतांनाच ते भरकटले जातात. पवित्र अशा गोवंश तस्करीच्या प्रकारात सुद्धा वाढ झालेली असून यात अनेक मुकी जनावरे बळी पडत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मारेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्याना एका आठवड्याच्या आत आळा घाला, नाहीतर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मारेगाव तालुका भाजपातर्फे निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी मारेगाव तालुका भारतीय जनता पक्ष अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, युवामोर्चा शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर, बाजार समिती संचालक अविनाश लांबट,  पवन ढवस, आनंद पचारे, प्रसाद ढवस, रवी टोंगे, गणेश झाडे, दत्तू लाडसे, सुहास वरारकर, दुष्यन्त निकम, विजय खिरटकर, लीलाधर काळे, मारोती तुराणकर, ज्ञानेश्वर खामनकर, शेखर चिंचुलकर, राजू मिलमिले, विनोद ठावरी, निलेश चौधरी, चंद्रकांत धोबे, प्रवीण दातारकर, भाऊराव शेळके, सचिन दातारकर, जगदीश ठेंगणे, आदर्श खंगार यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.