भाजपचा रंगला प्रभाग 1 मध्ये प्रचार – विकासाला मतदारांचे प्राधान्य

गृहभेटींमध्ये जनतेच्या समस्या ऐकल्या: बोदकुरवार यांनी दिली विकासाची हमी

बहुगुणी डेस्क, वणी: दिनांक 24 नोव्हेंबर रोजी वणी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग देण्यासाठी भाजपने प्रभाग क्रमांक 1 मध्ये भव्य रॅली काढत डोअर-टू-डोअर प्रचार सौ. मीनाक्षी शैलेश जुनघरे (अ), श्री. उमाकांत महादेवराव जोगी (ब) तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम यांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात आली. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात रॅलीला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेली ही रॅली जणू उत्सवाचा माहोल निर्माण करत होती. घोषणांच्या निनादाने वातावरण भारून गेले होते.

सकाळी 9 वाजता स्थानिक मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला, आणि लगेचच रॅली निघाली. मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात ही रॅली प्रभागातील विविध भागांतून फिरली, ज्यात डोअर टू डोअर गृहभेटी घेऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला. प्रभागातील रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि युवकांसाठी संधींसारख्या मुद्द्यांवर उमेदवारांनी जनतेच्या समस्या ऐकल्या आणि भाजपच्या विकास आराखड्याबाबत माहिती दिली.

सौ. मीनाक्षी जुनघरे यांनी महिलांच्या सुरक्षिततेवर जोर देत सांगितले की, “प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला विकासाची साथ मिळेल,” तर श्री. उमाकांत जोगी यांनी युवकांशी बोलताना “स्वच्छतेकडे जातीने लक्ष देऊन आदर्श प्रभाग बनवून,” असे आश्वासन दिले. नगराध्यक्ष उमेदवार सौ. विद्या आत्राम यांनी एकजुटीवर भर देत म्हणाल्या, “भाजपच्या प्रयत्नाने वणीचा प्रत्येक प्रभाग चमकेल.” या संवादात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यात अनेकांनी गेल्या काळातील कामगिरीचे कौतुक करत पाठिंबा जाहीर केला. रॅलीने प्रभागाला नव्या ऊर्जेचा श्वास दिला, आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वातावरण भारून टाकले. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या रॅलीत प्रत्येक घरासमोर उमेदवारांचे स्वागत करण्यात आले; कुठे औक्षण तर कुठे फुलांच्या उधळणीने त्यांचे स्वागत झाले. भाजपा जिल्हा सचिव संतोष डंबारे, भाजपा जिल्हा युवा मोर्चा जिल्हा सचिव श्रेयस हरणे, भाजपा वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही रॅली केवळ ताकद दाखविणारी नव्हती, तर विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना पटविण्याचा प्रयत्न होता. ढोल-ताशांच्या गजरात झालेली ही प्रचारयात्रा निवडणुकीच्या वातावरणात नवा रंग भरून गेली.

Comments are closed.