सुशील ओझा, झरी: पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रकाश नगराळे यांना प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून बढती देण्यात आली. प्रभार स्वीकारून ते शिक्षण विभागात रुजू झालेत. त्याआधी वणी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केले. विविध उपक्रमांद्वारे वणी तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढीसाठी कार्य केले.
तत्कालीन गटशिक्षणाधिकारी हडोळे यांची बदली झाल्यामुळे त्यांचे प्रभारी म्हणून नगराळे रुजू झालेत. यावेळी केंद्रप्रमुख प्रकाश दिकोंडावार, केंद्रप्रमुख, नरांजे यांनी नगराळे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सोबतच इब्टा संघटना झरीचे तालुका अध्यक्ष जगदीश आरमुरवार व पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट देऊन पुष्पगुच्छाने स्वागत केले.
कोरोना काळात शाळा बंद; परंतु शिक्षण सुरू या उपक्रमातंर्गत नगराळे यांनी प्रभार घेताच पहिल्याच दिवशी गटसंसाधन झरी येतील सर्व साधनव्यक्ती व केंद्रप्रमुख व तंत्रस्नेही यांची सभा बोलावली. आदिवासी बहुल तालुक्यातील विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहू नये यासाठी ऑनलाईन माध्यम वऑफलाइन माध्यमातून शिक्षण विद्यार्थ्यांना कसे देता येईल यासाठी नियोजन करून आराखडा तयार करण्यात आला. सर्व केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती यांना आपले जबाबदारी वाटून देण्यात आले. कोविड 19 ह्या महामारीच्या काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये तेव्हा शासनाने सुरू केलेले विविध उपक्रम,विद्यार्थ्यांना माहिती करून ग्रामीण भागातील शिक्षण थांबणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
एकंदरीत कोरोनाच्या काळात झरी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्ता वाढवू आणि झरी चे नाव लौकिक करून एक चांगली दर्जा मिळवून देऊ त्यासाठी वेध झरीजामनी ग्रुप तयार करून विविध उपक्रम राबविण्यात आले.