महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेपेरा येथे रक्तदान शिबिर

अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन

विवेक तोटेवार, वणी: 6 डिसेंबर सोमवार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी तालुक्यातील नांदेपेरा येथील जेतवन बुद्ध विहार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबीर हे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत राहणार आहे. तरी तालुक्यातील अधिकाधिक रक्तदात्यानी रक्तदान करण्याचे आव्हाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

तालुक्यातील नांदेपेरा येथे सोमवार 6 डिसेंबर रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबिर हे जेतवन बुद्ध विहार नांदेपेरा येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहणार आहे. या रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय बोद्ध महासभा शाखा नांदेपेरा/ पोहना यांच्याद्वारे करण्यात आले आहे.

रक्तदान शिबिरासाठी चंद्रपूर शासकीय महाविद्यालयात चमू येणार आहे. कोविड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता अधिकाधिक लोकांनी रक्तदान करण्यास यावे असे आव्हाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय बोद्ध महासभा शाखा नांदेपेरा येथील प्रफुल शेंडे, चंद्रकांत धोपटे, गोपाल डोंगे, निखिल डोंगे, रवींद्र वनकर, शंकर शेंडे यांनी केले आहे.

हे देखील वाचा:

मृत्युच्या दारातून परतताना… : आशिष पेढेकर

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा अटकेत

Comments are closed.