उद्या वणीतील कल्याण मंडपम येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

तहसिल कार्यालय व नगरपालिकेद्वारा आयोजन, सहभागी होण्याचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुधवारी दिनांक 15 जून रोजी शहरातील अटल बिहारी वाजपेयी सभागृह (कल्याण मंडपम) येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रेरणेतून तहसील कार्यालय वणी आणि नगरपरिषद वणी यांच्या वतीने या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास निःस्वार्थ सेवा 24 तास रक्तदान गृप वणी यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

अपघात अथवा प्रसूतीपश्चात रक्तस्त्राव, शस्त्रक्रीया आणि इतर गंभीर आजारामध्ये योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचे रक्तच दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही. तसेच दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येवू शकत नाही. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण 36 तासात रक्ताची पातळी पूर्ववत होते, तसेच साधारण 2 ते 3 आठवड्यात रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास अथवा इजा होत नाही.

याप्रमाणे रक्तदान म्हणजेच जिवनदान या उदात्त हेतुने सर्व नागरिकांनी रक्तदान शिबीरात रक्तदान करुन आपला सहभाग नोंदवावा असे नम्र आवाहन करण्यात येत आहे. सदर रक्तदान शिबीराला तालुक्यातील विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना यांनी सक्रीय सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
ईच्छूक रक्तदात्यांनी अमोल धानोरकर- मो. नं. 8007393770, राज चौधरी मो. नं. 9850870450 तसेच तहसील कार्यालय व नगरपरिषद कार्यालय येथे संपर्क साधावा.

हे देखील वाचा:

चक्क हैदराबादहुन तो ‘मटका’ लावायला आला वणीत !

Comments are closed.