प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या वणी येथे रक्तदान शिबिर 

अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे स्माईल फाउंडेशन चे आवाहन 

Jadhao Clinic

जितेंद्र कोठारी, वणी : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वणी येथील सामाजिक संघटन स्माईल फाउंडेशनतर्फे बुधवार 26 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे. येथील टागोर चौकात विठ्ठल रुक्मिणी सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शिबिर राहणार आहे .

रक्तदान शिबिरात रक्त संकलनसाठी चंद्रपूर शासकीय महाविद्यालयातील ब्लड बँकचे चमू येणार आहे. कोविड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता अधिकाधिक लोकांनी रक्तदान करण्यास यावे, असे आवाहन स्माईल फाउंडेशन द्वारे करण्यात आले आहे .

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!