अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

निळापूर शिवारातील हनुमान मंदिराजवळील घटना

विवेक तोटेवार, वणी: निळापूर येथील महावीर कॉटन मार्केटच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारीच्या सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाचे प्रेत आढळल्याची घटना उघडकीस आली. हा परिसर दाट झाडाझुडपांचा आहे. या निळापूर शिवारात 30 ते 35 वर्षे वयाच्या पुरुषाचे प्रेत आढळले. हे प्रेत अत्यंत कुजलेले होते. त्याचे केस गळाले होते. मृतदेहावर पिवळ्या-काळ्या रंगाचे शर्ट होते. तसेच त्याच्या अंगावर निळ्या रंगाची अंडरवेअर होती. या वर्णनाच्या इसमाची ओळख पटल्यास वणी पोलीस ठाण्यात कळविण्याचे आवाहन करण्यात आले. ही माहिती पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर 7239225078, पीएसआय धनंजय रत्नपारखी 9623733301, पोलीस हेडकॉन्स्टेबल होडगीर 9623441265 यांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  या प्रकरणी कलम 194 बीएनएसएस अन्वये मर्ग वणी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन होडगीर करीत आहेत.

Comments are closed.