वणीत मंगळवारी महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर

टिकाराम कोंगरे यांच्या पुढाकारातून व महिला काँग्रेसच्या वतीने आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: मंगळवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी शहरातील शेतकरी मंदिर येथे स्तन कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर स. 11 ते संध्याकाळी 5 पर्यत होणार आहे. नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्ट्स्टिट्यूटी टीम शिबिरार्थ्यांची तपासणी करणार आहे. काँग्रेसचे नेते व गुरुदेव नागरी सह पतसंस्थेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांच्या पुढाकारातून व महिला काँग्रेसच्या सहकार्यातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा परिसरातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्याच्या काळात महिलांना होणारा सर्वात गंभीर आजार म्हणजे स्तनांचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) आहे. महिलांना हा रोग असल्याचे कळत नसल्याने कॅन्सर वाढत जातो. जेव्हा कळते तेव्हा खूप उशिर झाला असतो. 40 टक्के स्तनाचा कर्करोग हा 35 ते 45 वयोगटातील महिलांना होतो. शहरात राहणा-या 25 पैकी एकीला तर खेड्यात राहणा-या 30 महिलां पैकी एकीला ब्रेस्ट कॅन्सर असण्याची शक्यता असते. या रोगाचे वेळीच निदान झाल्यास हा रोग बरा होता. ही बाब लक्षात घेऊन टिकाराम कोंगरे यांच्या पुढाकाराने वणीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची टीम करणार तपासणी – टिकाराम कोंगरे
परिसरातील अनेक महिलांना स्तन कॅन्सरमुळे जीव गमवावा लागला. ग्रामीण भागातील महिला तपासणी करीत नसल्याने याचे निदान होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातही या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन महिला काँग्रेसच्या सहकार्यातून हे शिबिर होत आहे. नागपूर येथील कॅन्सर स्पेशालिस्ट रुग्णांची तपासणी करणार आहे. त्यामुळे याचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

महिलांना अधिक माहितीसाठी महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या बोबडे, महिला तालुका अध्यक्ष सुरेखा लोडे, महिला शहर अध्यक्ष शामा तोटावार, मारेगाव तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष माया गाडगे, झरी तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष देवका येनगंटीवार यांना संपर्क साधता येणार आहे.

कार्यक्रमाचे नियोजन मेघश्याम तांबेकर, प्रमोद वासेकर, आशिष मोहितकर यांच्या मार्गदर्शनात सुरु असून गुरुदेव नागरी सह. पतसंस्थेचे कर्मचारी, संचालक मंडळ व महिला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिबिरासाठी परिश्रम घेत आहेत.

 

Comments are closed.