बहुगुणी डेस्क, वणी: झरी तालुक्यातील गणेशपूर (खडकी) येथील शेतकरी संतोष तुळशीराम आसूटकर (वय ५२) यांच्या मालकीच्या म्हशीचा विद्युत तारेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (3 सप्टेंबर) सकाळी घडली. या प्रकरणी दोषीवर कार्यवाही करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पशूपालकाने केली आहे.
सकाळी अंदाजे १०:३० वाजता आसूटकर आपल्या गावाजवळील शेतात म्हैस चारण्यासाठी नेत असताना गावाजवळील डीपीजवळ विद्युत तार तुटून जमिनीवर पडलेली होती. चरत असताना म्हैस त्या तारेजवळ गेली आणि करंट लागल्याने ती जागीच मृत पडली.

घटनेनंतर आसूटकर यांनी तातडीने लाईनमनला कळवून घटनास्थळी बोलावले. लाईनमनने जागेवर येऊन पाहणी केली. मृत म्हैस काळ्या रंगाची असून, तिचे वय अंदाजे चार वर्षे आणि किंमत सुमारे ९२ हजार रुपये असल्याची माहिती आसूटकर यांनी दिली.



Comments are closed.