शिबला येथे जागतिक आदिवासीदिन साजरा

विचारवंतांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन

0

सुशील ओझा, झरी: जागतिक आदिवासीदिन रविवारी झरी तालुक्यातील शिबला येथे साजरा करण्यात आला. त्यानिमित्त क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदे झरी तालुकाध्यक्ष पांडुरंग पोयाम आणि कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम घेतलेत.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमिवर हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने साजरा झाला. प्रेरणादायी महामानवाच्या कार्य आणि क्रांतिवर चर्चा झाली. ज्ञानाचा मार्ग सर्वांनी धरायला हवा असा सूरही निघाला. विविध छोट्या-मोठ्या कार्यक्रमांचं यावेळी आयोजन झालं.

विशाल आत्राम, गजेंद्र कुसराम, रवींद्र मडावी, अशोक तोडसाम, फुलाजी तलांडे, गणेश परताम, गजानन मेश्राम, प्रकाश मेश्राम, प्रदीप दुधकोहले, विजय नेहारे, सूरज सिडाम, अतुल देवानंद पंध्रे, किनाके, अमोल मडावी, रोहित तोडसाम, शिवम तोड्साम, गणेश तालांडे, मारोती मडावी, दत्ता कोवे, निकेश रुपेश मडकाम, स्वप्नील मडावी, श्रीकांत तळांडे ,राजू मडावी, नागोसे, लक्ष्मण मेश्राम, शंकर आत्राम, वसंता मेश्राम, प्रभू टेकाम, पंकज मडावी आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.