सिमेंट फॅक्टरी व आठवडी बाजार बंदचे धडकले आदेश

हजारो परप्रांतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे दहशतीचे वातावरण

0

सुशील ओझा, झरी: कोरोना व्हायरसची साथ वाढत असल्याने शासनाने विविध खबरदारी घेतली आहे. त्याचे परिणाम आता स्थानिक पातळीवरही दिसून येत आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये याकरिता सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहे. याच अनुशंगाने मुकूटबन येथे आरसीसीपीएल सिमेंट फॅक्टरीचे काम एक वर्षांपासून युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हा सिमेंट कारखान्यातील काम बंद करण्याचे आदेश आले आहेत. त्याचसोबत आठवडी बाजारही बंद करण्याचे आदेश पोहोचले आहे.

फॅक्टरीत विविध कामाकरिता ४ ते ५ हजार अधिकारी कर्मचारी व कामगार आहे. इथे उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब ओरिसा, तेलंगणा इत्यादी परराज्यासह नाशिक पुणे चंद्रपूर व तालुक्यातील लोक काम करीत आहे. होळी सणाकरिता बाहेर राज्यातील २०० ते ३०० अधिकारी कर्मचारी ठेकेदार कामगार गेले एक महिन्यानंतर परत मुकुटबन येथे परत कामावर आले. ज्यामुळे मुकूटबन ग्रामवासियात कोरोना बाबत शंकेचे पेव फुटले.

त्याबाबत जिल्हापरिषद आरोग्य विभाग यवतमाळ येथून ग्रामपंचायत मुकूटबनला खबरदारी घेण्याकरीता पत्र प्राप्त झाले. त्या अनुशंगाने सरपंच शंकर लाकडे सचिव कैलास जाधव यांनी आरीसीपीएल सिमेंट फॅक्टरीच्या जनरल मॅनेजर यांना पत्र देऊन एक महिण्याकरिता काम बंद ठेवण्याचे कळविले आहे. तसेच कंपनीचे अधिकारी कर्मचारी, कामगार यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. व ग्रामपंचायतने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आदेश देण्याचे आले.

तालुक्यातील आठवडी बाजार बंद
मुकूटबन येथे दर सोमवरला आठवडी बाजार भरतो. बाजाराकरिता परिसरातील खेडे गावातील हजारो लोक भाजीपाला किराणा व बँकेच्या कामाकरिता येतात. परंतु सिमेंट कंपनीचे काम सुरू होताच हजारो कामगार वाढले व त्यांच्या सोयीनुसार रविवाला सुद्धा बाजार भरायला सुरवात झाली. याही बाजारात कंपनीतील बाहेर राज्यातील हजारो कामगार कर्मचारी खरेदी करतात. कोरोना विषानूवर मात करण्याकरिता बाजार भरविण्यावर बंदी आणली असून यापुढे आठवडी बाजार भरणार नाही. तसेच पानटपरी,पानपट्टी पाणठेला व जर्दा दुकानात सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने जिल्ह्यातील संपुर्ण पानठेले व इतर दुकाने बंद करण्याचे आदेश धडकले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.