सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: आपल्या भारतामध्ये गर्भाशयाचा कर्करोग हा सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. पहिल्या नंबरचा ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांचा कर्करोग आहे. जवळपास दर वर्षाला जवळपास तीन लाख महिलांना हा कॅन्सर होतो. त्या कॅन्सर झालेल्या महिलांचे 60 हजार 50 ते 60 हजार महिलांचा दरवर्षी मृत्यू होतो.
तिसऱ्या स्टेपमध्ये किंवा चौथ्या स्टेजमध्ये हा लक्षात येतो. आता बरीच जागृती झाली आहे. त्याच्यामुळे आजकाल पेशंट एक ते दोन महिन्यातून एकदा किंवा दोन-चार महिन्यातून एखादा पाहायला मिळतात. कॅन्सर होण्याची कारणे काय आहेत? हे समजून घेतलं पाहिजे. व्हायरसचा टाईप १६ आणि टाईप 18 हे कर्करोगाचं कारण ठरू शकतं. त्यासाठी बालविवाह किंवा खूप लवकर लग्न टाळावेत. कारण त्यामुळे जोडिदारासोबत शारीरिक संबंध अधिक वर्ष चालता. जे ५०-६० वर्षांपर्यंत अशांना खूप धोका असतो.
तसेच मल्टिपल प्रेग्नेंसी म्हणजे खूप वेळा बाळंतपण. हेदेखील धोकादायक असतं. असं प्रतिपादन शांतिमाला हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. संचिता नगराळे यांनी केलं. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार) द्वार नांदेपेरा रोड येथे गर्भाशयाच्या कर्करोगाची माहिती देणारे शिबिर झाले. जागतिक रया शिबिराचं आयोजन झालं. यावेळी आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य सुवर्णा चरपे आरोग्यपीठावर उपस्थित होत्या. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार)चे प्रदेश सरचिटणीस विजय नगराळे, वणी तालुका विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत खाडे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या या शिबिराची माहिती दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दिलीप भोयर उपस्थित होते..
डॉ. नगराळे मार्गदर्शन करताना पुढं म्हणाल्यात की, शारीरिक संबंधांतील जोडिदार वारंवार बदलत राहणंही धोक्याचं आहे. अजून एक कारण म्हणजे सोशल इकॉनॉमिक स्टेटस म्हणजे ज्यांची लहानपणापासूनची गरिबी. त्यामुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं. प्रतिकारशक्ती कमी होते. त्यासाठी आपण आहारासोबतच स्वच्छतेकडेही गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. तुम्ही जेवढे स्वच्छ राहाल व्यवस्थित तेवढंच नवऱ्यालापण सांगा. मासिकपाळीदरम्यान म्हणजेच पिरिअडमध्येसुद्धा तेवढंच स्वच्छ राहायला पाहिजे. जे सॅनिटरी पॅड वापरतात ते पॅड ४ तास किंवा ६ सहा तासांनी चेंज करायला पाहिजेत.
सर्वाइकल कॅन्सर झाल्यावर जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात, तेव्हा आम्ही साइन आणि सिम्प्टम्स तपासतो. पांढरा स्राव आणि रक्तस्राव वेगळा होतो. गाठी तयार होतात. फुलकोबी सारखी रचना तयार होते. त्याल हलका जरी स्पर्श केला तरी, रक्त येतं. डॉक्टरांच्या लक्षात येत की, हा कॅन्सर आहे. त्यासाठी बायोप्सी करून ते कन्फर्म केलं जातं. पॅथॉलॉजिकल टेस्ट रिपोर्ट येतो. मग त्यातून कळतं. आपण सुरवातीलाच प्रिव्हेन्शन म्हणजे अटकाव केला पाहिजे. व्हॅक्सिनेशन म्हणजेच लसिकरण केलं पाहिजे.
यावेळी आयुर्वेद तज्ज्ञ तथा विश्वयोग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्राच्या संचालिका वैद्य सुवर्णा चरपे यांनी उपस्थितांना यथायोग्य मार्गदर्शन केलं. त्या म्हणाल्या की, स्त्रीबीज आणि पुरुषबीजातून एक नवीन जीव जन्माला येतो. त्यामुळे गर्भधारणेपूर्वीच आपण योग्य पद्धतीने उपचार घेतले पाहिजे. तर नवीन येणारा जीव हा कधीही आजारी पडणार नाही किंवा फार कमी आजारी पडणारा असेल. त्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल. त्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक बळ मिळेल. सोबतच तो समाजशील असेल. असा जीव जन्माला घालण्याकरता आई-वडिलांनी केलेली पूर्वतयारी म्हणजे बीज संस्कार विधी. हा विधी बाळ जन्माला घालण्यापूर्वीच प्रत्येक इच्छुक मात्या पित्याने स्वतःवर करून घ्यायला पाहिजे.
अगदी घाईने गर्भधारणा होता कामा नये. याची तजबीज साडेतीन हजार वर्षांपूर्वी आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगून ठेवलेली आहे. हल्लीचं प्रेग्नेंसी प्लॅनिंग करणे याचा अर्थ असा होतो. एक मुलगी सोळा वर्षांची झाली की, तिला गौरी म्हणतात. तोपर्यंत ती बालिका असते. गौरी म्हणजे काय तर तिच्या शरीरामध्ये एक नवीन जीव जन्माला घालण्याकरिता निसर्गाचा जो स्त्राव आहे तो तिच्या शरीरामधून स्त्रवायला लागलेला असतो. ज्यावेळी शरीर त्या पद्धतीच्या हार्मोनल स्टेटसमध्ये जातं तेव्हा पाळी यायला लागलेली असते. त्याचवेळी तिच्या शरीरामध्ये स्त्री-बिजांची निर्मिती झालेली असते.
स्त्रियांच्या शरीरामध्ये, पुरुषांच्या शरीरामध्ये बिजाची निर्मिती ही त्याच्या वयाच्या १६-१७-१८व्या वर्षापासून सुरू होते. पण त्याला पोषण व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे. 16 वर्ष मुलीच्या शरीराची जडणघडण उत्तम पद्धतीने व्हायला पाहिजे. शरीर अन्नमय आहे, मन अन्नमय आहे. मन जसं अन्नमय आहे, तसंच ते संस्कारशील आहे. आपलं शरीर पंचमहाभूतांपासून बनतं. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, आत्मा, मन, बुद्धी आणि अहंकार या तत्त्वांनाही खूप महत्त्व आहे.
मनाचं आरोग्य जपलं पाहिजे. पोषण आहारावर भर दिला पाहिजे. जिथं शरीराची ताकद संपलेली असते, तिथं इच्छाशक्तीच्या बळावर कामं होत असतात. आइच्छाशक्ती चांगली ठेवायची असेल तर मन सक्षम केलं पाहिजे. मन कोण घडवणार आहे? तर सकस आहार घडवणार आहे. जिभेला जे आवडतं ते शरीराला पोषक नसतं. आणि शरीराला जे पोषक असतं ते जिभेला आवडत नाही. याच्यामध्ये सुवर्णमध्य साधायचा. अन्न ज्या पद्धतीने आपण घेतो, जितक्या मात्रेत घेतो, ज्या प्रकारचं घेतो, त्या त्या पद्धतीनं आपलं शरीर बनतं. विषयाच्या अनुषंगाने वैद्य सुवर्णा चरपे यांनी मांडणी केली. या मार्गदर्शनांचा अनेक स्त्रियांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन उमा तेलतुमडे यांनी केलं. या शिबिराचा लाभ तालुक्यातील अनेक महिलांनी घेतला.
हे शिबिर म्हणजे सामाजिक उत्तरदायित्त्व !
जागतिक महिलादिनाचं औचित्य साधून हे आरोग्य शिबिर झालं. गर्भाशयाचा कर्करोग फार गंभीर असतो. योग्य उपचारांनी आणि काळजी घेतल्याने हा बरा होऊ शकतो. हा आजार लपवून ठेवण्यासारखा नाही. याचं शास्त्रीय मार्गदर्शन वणी शहरासह ग्रामीण भागालाही व्हावं म्हणून हे शिबिर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार)द्वारा आयोजित केलं.आमच्या डोक्यात हा विचार बऱ्याच दिवसांपासून होता. तो फलद्रूप झाला. या आजाराबद्दलची जनजागृती व्हावी हा आमचा प्रमुख हेतु आहे. सोबतच सामाजिक उत्तरदायित्त्व म्हणून आम्ही हा उपक्रम राबविला. याचं श्रेय रा. कॉं. विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत खाडे यांचं आहे.विजय नगराळे
प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार)
Comments are closed.