बहुगुणी डेस्क, वणी: बुद्धीचे बळ पणाला लावणारा खेळ म्हणजेच चेस अर्थात बुद्धिबळ. या खेळाचा उगमच मुळात भारतातून झाला असं म्हणतात. चेस हा खेळ मनोरंजन तर करतोच, मात्र सोबतच बुद्धीला चालनाही देतो. परंतु अनेकांना चेस म्हणजे बुद्धिबळ खेळताच येत नाही. त्यांच्यासाठी चेस शिकण्याची एक सुवर्णसंधी वणीतील मास्टर चेस अकादमीने आणली आहे.या संस्थेद्वारा रविवार दिनांक 20 एप्रिलपासून समर चेस कॅम्प म्हणजेच उन्हाळी बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर होत आहे. या शिबिरात 5 ते 20 या वयोगटातलं कुणीही सहभागी होऊ शकतं. केवळ पहिल्या 100 विद्यार्थ्यांना चेस ट्रेनिंग समर कॅम्प मध्ये प्रवेश दिला जाईल. जागा मर्यादित असल्यामुळे त्यांनी आजच 9657344171 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आपली जागा निश्चित करावी.
या शिबिरात सुरुवातीला चेस अर्थात बुद्धिबळ या खेळाचा संपूर्ण प्राथमिक परिचय दिला जाईल. चेस खेळण्याची त्यांच्याकडून सराव करून घेतला जाईल. चेस खेळण्याचे नियम आणि बारकावे सांगितले जातील. तर शेवटीच्या टप्प्यात बुद्धिबळाच्या चाली कशा खेळाव्यात, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. शिबिरार्थ्यांमध्ये अंतर्गत चेसच्या मॅचेस सामने खेळवल्या जातील. तसेच खेळाडुंना त्यांनी केलेल्या चुकांबाबत मार्गदर्शन केले जाईल. प्रादेशिक, राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध कॉम्पिटिशन्स म्हणजे बुद्धिबळ स्पर्धांबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. सोबतच एआयसीएफ (AICF) म्हणजेच ऑल इंडिया चेस फेडरेशन आणि (FIDE) एफआयडीइ Fédération Internationale des Échecs, याची म्हणजेच चेसच्या आंतरराष्ट्रीय संस्थेत रजिस्ट्रेशन कसे करावे, याबद्दलदेखील मार्गदर्शन केले जाईल.
चेस म्हणजे बुद्धिबळ या खेळामुळे तुमचा आयक्यू (IQ) म्हणजेच बुद्ध्यांक वाढतो. स्मरणशक्ती आणि एकाग्रतेत वाढ होते. प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजेच अडचणी सोडवण्यास मदत करण्याची क्षमता वाढते. धैर्य गुणात वृद्धी होते. कौशल्यांचं नियोजन करता येतं. कल्पनाशक्तीत वाढ होते आणि तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवता येतो. या शिबिरात सहभागी होण्याकरिता आपण मारुती कोंडांगुर्ले यांच्याशी 9657344171 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. सर्व शिबिरार्थ्यांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त इंटरनॅशनल चेस एफआयडीई यांच्याकडून प्रशिक्षण मिळेल. जागा मर्यादित असल्यामुळे ही सुवर्णसंधी दवडू नका. अशी विनंती बुद्धिबळ प्रशिक्षण उन्हाळी शिबिराच्या आयोजक मास्टर चेस अकॅडमीने केली आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करा.
Comments are closed.