मी महामानवांच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करीत आहे- पुष्पा आत्राम
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई आत्राम यांनी केले शहरात वस्त्रदान
पुरुषोत्तम नवघरे, वणी: या देशाला तथागत गौतम बुद्धांपासून आतापर्यंतच्या संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांसारख्या अनेक महामानवांचा आदर्श लाभला आहे. त्यांनी समोर ठेवलेल्या आदर्शांवर चालण्याचा प्रयत्न करीत असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आत्राम म्हणाल्या. विविध सणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाण्याच्या टाकीजवळील कुवारा भिवसन मंदिराच्या परिसरात फिरस्त्यांना आणि गरजूंना वस्त्रदान केले. यावेळी पी. डी. आत्राम, प्रमोद चांदवडकर व मान्यवर उपस्थित होते.
नुकतेच अनेक धर्मांचे सण सलग आलेत. याच विविध सणांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आत्रम यांनी कपडे वाटप केले. यासाठी त्यांना माणुसकीची भिंत, त्यांचे चिरंजीव तुरुंगाधिकारी वैभव आत्राम, आकाशवाणी अधिकारी राहुल आत्राम आणि कविता आत्राम यांचे विशेष सहकार्य लाभले.या वस्त्रदानाचा लाभ बहुसंख्य फिरस्ती फकीर आणि गरजूंनी घेतला. पुष्पा आत्राम ह्या विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य करतात. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी सेवक पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळालेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments are closed.