सोनिया गांधींची ईडी चौकशी विरुद्ध काँग्रेस रस्त्यावर

खासदार बाळू धानोरकर यांचे नेतृत्वात वणी येथे निषेध व धरणे

जितेंद्र कोठारी, वणी : नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात सक्तवुसली संचलनालय अर्थात ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलाविले. सोनिया गांधी मंगळवारी सकाळी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर काँग्रेसकडून देशभरात रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यात आले. राज्य काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे नेतृत्वात वणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधीवर ईडीच्या कारवाईचे निषेध करून धरणे दिले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मंगळवारी सकाळी आयोजित धरणे आंदोलनमध्ये खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रातील मोदी सरकार दडपशाहीचे वापर करुन लोकशाही संपवित असल्याचा आरोप केला. आज सकाळीपासून शहरात पाऊस सुरु असताना खासदार धानोरकर व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

खासदार बाळू धानोरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद वासेकर, शहराध्यक्ष प्रमोद निकुरे, आशिष खुलसंगे, संजय खाडे, डॉ.महेंद्र लोढा, राजाभाऊ बिलोरीया, पुरूषोत्तम आवारी, प्रमोद लोणारे, विकेश पानघाटे, ॲड.सूरज महारतळे, जयसिंग गोहोकार, प्रशांत गोहोकार यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष वंदना आवारी, तालुकाध्यक्ष संध्या बोबडे, शहराध्यक्ष सविता ठेपाले, मंगला झिलपे, मंदा बांगरे, सुरेखा वडिचार, विजया आगबत्तलवार ईत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Comments are closed.