शोषण विहीन समाजाची स्थापना हेच कम्युनिस्टांचे लक्ष्य – कॉ. शंकरराव दानव

वणी विधानसभा क्षेत्रात माकपच्या कार्यकर्ता शिक्षण शिबिराला सुरूवात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शोषक आणि शोषित यांच्या संघर्ष शोषणाची व्यवस्था संपविण्यासाठी असून कार्ल मार्क्स यांच्या विचारावर आधारित कम्युनिस्टांचा जन्म झाला आहे. जग बदलण्याचा, शोषणाला व शोषणावर आधारित समाजव्यवस्था बदलण्यासाठी मार्क्सवाद हेच सूत्र दिले. शोषण विहीन समाजाची स्थापना हेच कम्युनिस्टांचे लक्ष्य आहे. असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कमळवेली येथे झालेल्या पक्ष शिक्षण शिबिरात कॉ. शंकरराव दानव यांनी केले. झरी तालुक्यातील कमळवेली येथे पक्ष कार्यकर्त्यांना शिबिर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिनांक 14 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान पक्ष कार्यकर्ता शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 14 सप्टेंबरला कमळवेली येथे शिबिर घेण्यात आले.

या शिबिराला पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ. शंकरराव दानव, जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, ऍड.दिलीप परचाके हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर शिबिराचे अध्यक्ष म्हणून झरी तालुका सचिव कॉ. उरकुडा गेडाम हे होते. या शिबिराला कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी पक्षाचे संघटनात्मक स्वरूप सांगून संघटनावाढीचे मार्गदर्शन केले तर ऍड. कॉ. दिलीप परचाके यांनी पक्षाच्या संघर्षाची माहिती विशद केली तसेच आपल्या मागण्या व अधिकार प्राप्त करून घ्यायचे असेल तर संघर्षासोबतच न्यायालयीन लढाई करणे गरजेचे आहे, असे सांगितले.

शिबिराची प्रस्तावना केलापूर तालुक्याचे सचिव कॉ. चंद्रशेखर सिडाम यांनी केले. या शिबिराला झरी तालुक्यातील अनेक गावातील स्त्री पुरुष व युवक सहभागी झाले होते. दि. १७ सप्टें. शनिवारला केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील आदिवासी समाज भवन, दि. २० सप्टें. मंगळवारला वणी तालुक्यातील विजासन देवी मंदिर, गोडगाव, दि. २४ सप्टें. शनिवारला मारेगाव तालुक्यातील शंकर मंदिर, मार्डी रोड, मारेगावला कार्यकर्ता शिक्षण शिबीर घेण्यात येत आहे.

हे देखील वाचा: 

राजूर येथील नियमबाह्य कोळसा सायडिंग व कोल डेपो बंद होणार का?

निर्गुडा नदीच्या पुलावर ट्रकला भीषण अपघात, कठडे तोडून ट्रक कोसळला नदीत

Comments are closed.