
बहुगुणी डेस्क, वणी: नजिकच्या भालर येथे मृतदेह आढळ्याने एकच खळबळ उडाली आहे. महादेव अमृत बहादे (59) असे या मृत इसमाचे नाव असून ते मुळचे भद्रावती येथील रहिवासी होते. ते वेकोलिच्या राजूर खाणीत सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत होते. ही घटना शुक्रवार दिनांक 28 मार्चला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
भालर गावाजवळील शिव मंदिर व स्मशानभूमी दरम्यान गुंज नाला आहे. या मार्गावरून ये-जा करणा-या काही लोकांना दुपारी या ठिकाणी एक मोपेड पडलेल्या अवस्थेत दिसली. तसेच मोपेडच्या शेजारी एका इसमाचा मृतदेह आढळला. लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. महादेव अमृत बहादे (59) अशी मृताची ओळख पटली. ते मुळचे भद्रावती येथील होते. ते सध्या राजूर येथे सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत होते.
महादेव यांचा मृत्यू कशाने झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. सध्या अपघाताचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र त्यांच्या पायात बूट नसल्याने घातपाताच्या एन्गलने देखील पोलिस तपास करीत आहे. महादेव यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Comments are closed.