बुरांडा (ख) येथे आढळला 60 वर्षीय इसमाचा मृतदेह

मृतकाची अखेर पटली ओळख

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बुरांडा (खडकी) येथे एका 60 वर्षीय इसमाचा मृतदेह गावानजीक शेतात रविवारी आढळला. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चेला पेव फुटले आहे. मृत्यूदेहाची ओळख पटली. तो बुरांडा येथील विठ्ठल टोंगे यांचा असल्याचे उघडकीस आले आहे.

प्राप्त माहितीनुसार विठ्ठल टोंगे हे जनावरांना चारा आणण्यासाठी जातो म्हणून 28 ऑगस्टला घरून गेलेत. मात्र ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबियांनी त्यांचा दोन दिवस शोध घेतला. तरीही त्यांना ते कुठेही आढळून आले नाहीत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मात्र रविवारी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता दरम्यान गावानजीक असलेल्या शेतातील ज्वारीत त्यांचा मृत्यूदेह एका व्यक्तीला आढळला. मृत्यूचे कारण कळू शकले नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात विविध चर्चेला पेव फुटले आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.