अखेर अनिकेतचा मृतदेह आढळला

शनिवारी घेतली होती पाटाळाच्या पुलावरून उडी

0

विवेक तोटेवार, वणी: कुचना येथील इंजिनियरिंग करणा-या विद्यार्थ्याने काल शनिवार 26 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास पाटाळाच्या पुलावरून उडी टाकली होती. आज दुपारी 12 वाजताच्या दरम्यान या तरुणाचा कोना जवळ मृतदेह आढळून आला.

अनिकेत अरुण वैद्य (22) रा. कुचना या इंजिनियरिंगच्या थर्ड इयरचा विद्यार्थी होता. तो घरून निघून गेला होता. तो घरी नसल्याने त्याचे वडील व भाऊ त्याचा शोध घेत होते. शनिवार 26 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास तो पाटाळा पुलाजवळ दिसून आला. त्याने जसे आपल्या वडील व भावाला बघितले तोच धावत जाऊन त्याने पुलावरून नदीत उडी घेतली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कालपासून अनिकेतचा शोध सुरू होता. अखेर आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास अनिकेतचा मृतदेह कोना गावाजवळ आढळून आला. अऩिकेतने असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही. तो इंजिनिअरिंग करत होता. सध्या लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद असल्याने तो आपल्या घरी येऊन होता. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.