दीपक चौपाटी परिसरात चोरट्याने मारला मोठा हात

पिकअप वाहनाच्या डिक्कीतील 90 हजार रूपये उडवले

विवेक तोटेवार, वणी: त्या शेतकऱ्याला कापसाच्या चुकाऱ्याचे 90 हजार रुपये मिळाले. हे पैसे त्याने पिकअप वाहनाच्या डिक्कीत ठेवलेत. शहरातील दीपक चौपाटीवर तो काही काळ थांबला. तिथून तो ड्रायव्हरसोबत काही अंतरावर गेला. त्याच दरम्यान वाहनातील 90 हजार रूपयांवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे कोरपना तालुक्यातील गाडेगाव येथील शेतकरी सचिन संजय देवतळे यांना तब्बल 90 हजार रूपयांचा फटका बसला.

ही बाब लक्षात आल्यावर सर्वप्रथम त्यांनी परिसरात विचारपूस केली. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर त्यांनी तत्काळ वणी पोलीस ठाणे गाठले. तिथे रीतसर तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दीपक चौपाटी परिसर अलीकडच्या काळात गुन्हेगारी घटनांसाठी कुविख्यात होत आहे. त्यातही पुन्हा एक घटना घडली. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

Comments are closed.