अल्पसंख्याक महिलांनी मुख्य प्रवाहात येणे गरजेचे: ऍड नासिर अली कादरी

NBSA विधी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पार

विवेक तोटेवार, वणी: 14 ऑगस्ट रोजी नूरजहाँ बेगम सलाम अहेमद महिला विधी महाविद्यालय, बुरांडा येथे पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमात 10 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य ऍड नासिर अली कादरी होते. अल्पसंख्याक महिलांनी आता मुख्य प्रवाहात येण्याची गरज असल्याचे आवाहन कादरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सत्र न्यायालयाने दिवाणी न्यायाधीश तय्यब अली कादरी, दिवाणी न्यायालय मारेगाव येथील न्यायाधीश नीलेश वासाडे, नूरजहाँ बेगम सलाम अहेमद कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित वनकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलिझा खान व प्रियंका अग्रवाल यांनी केले. तर उपस्थितांचे आभार ऍड प्रयाग रामटेके यांनी मानले.

अल्पसंख्याक मुलींनी आता घराच्या चार भिंतीच्या आत न राहता समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन देशाच्या विकासात हातभार लावण्याची गरज असल्याचे मत ऍड नासिर अली कादरी यांनी मांडले. कार्यक्रमात प्राचार्य पूजा बनकर, हुमेरा शेख, रोहित वनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हुमेरा शेख आणि विध्यार्थ्यांनी यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

नोकरी: शेवाळकर डेव्हलपर्समध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

मयूर मार्केटिंगमध्ये 15 ऑगस्टपासून अमृत महोत्सव महासेल सुरू

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये आजपासून ‘फ्रीडम’ ऑफरला सुरुवात

Comments are closed.