जब्बार चीनी, वणी: आकाश पेंदोर मृत्यू प्रकरणी मृतकांच्या कुटुंबीयांनी निवेदन देऊन उपचार करणा-या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. उपचारानंतर काही वेळातच आकाशचा मृत्यू झाला होता. चुकीच्या उपचारामुळे आकाशचा मृत्यू झाला असा आरोप करत संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मत्ते यांच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना मारहाण केली होती तसेच दवाखान्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी वणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सोबतच मृतकाच्या भावाने तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याकरिता निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वणीतील जत्रा रोड परिसरात डॉ पदमाकर मत्ते यांचा दवाखाना आहे. सोमवार 18 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मृतक आकाश उर्फ विकास हनुमान पेंदोर (24) रा. रंगनाथ नगर वणी याला उलटी सुरू होती. याबाबत आकाशच्या आईने आकाशचा भाऊ अमर याला फोन करून माहिती दिली. अमरने सुमारे 1 वाजताच्या दरम्यान आकाशला डॉ पदमाकर मत्ते यांच्याकडे उपचारासाठी आणले.
डॉक्टरांनी आकाशची तपासणी करत स्वतः जवळ असलेल्या दोन लस दिल्या, सोबतच औषध लिहून दिले व घरी जाऊन आराम करण्यास सांगितले. अमर याने औषध घेऊन घरी आला. डॉक्टरांनी दिलेला ज्युस पिताच आकाशची तब्बेत अधिकच बिघडली. भाऊ अमर याने त्वरित वणीच्या एका खासगी रुग्णालयात आकाशला दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
डॉक्टरांमुळे आकाशला आपला जीव गमवावा लागला. सोबतच उत्तरीय तपासणीचे नमुने फॉरेन्सिक लॅब ला पाठवावे व पोलीस टीम समक्ष उत्तरीय तपासणी करण्यात यावी. असे निवेदनात म्हटले आहे. व मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या प्रकरणात संतप्त झालेले मृतकाचे नातेवाईक व मित्र शव घेऊन डॉ मत्ते यांच्या दवाखान्यात गेले व तिथे त्यांनी डॉक्टरला मारहाण करत दवाखान्याची तोडफोड केली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माया चाटसे करीत आहे.
हे देखील वाचा: