तलावात सापडलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली

अज्ञात इसमाचा मारेगाव जवळील तलावात होता मृतदेह

0

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरापासून 2 किमी अंतरावर असलेल्या मारेगाव येथील विद्युत महामंडळ कार्यालयानजीक तलावात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना मंगळवार 19 जानेवारी ला सकाळी 11 वाजता दरम्यान उघडकीस आली. मात्र अखेर सहा तासानंतर त्या अज्ञात मृतकाची ओळख पटली. नीलेश रामेश्वर नहाते (35) रा. पिंपळापूर, ता. राळेगाव असे मृतकाचे नाव आहे.

one day ad 1

प्राप्त माहितीनुसार पिंपळापूर येथील रहिवासी असलेले मृतक नीलेश रामेश्वर नहाते हे 12 जानेवारीला घरून निघून गेले. नीलेश यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता ते सापडले नाही. दरम्यान 19 जानेवारीला सकाळी वडकी येथे त्यांचे वडील मुलगा हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.

दरम्यान या घटनेची पो. उप. नि. अमोल चौधरी यांनी वडकी पोलिस स्टेशनला माहिती दिली. वडकी पोलिसांनी मृतकाचे वडील व मोठा भाऊ यांना मारेगाव येथे पाठवले आणि मृतदेह पाहताच त्या अज्ञात इसमाची ओळख पटली. हा मृतदेह आपल्याच मुलाचा असल्याची ग्वाही पोलिसांसमोर दिली. नीलेश यांच्या मृत्यूचे कारण कळु शकले नाही. पुढील तपास पो. उप.नि.अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आनंद अचलेवार करीत आहे.

हेदेखील वाचा

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

हेदेखील वाचा

अडेगाव, अर्धवन, कमळवेल्ली व धानोरा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

mirchi

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!