देशीकट्ट्यावर शेखर वांढरे यांचा या ‘उपलब्धी’साठी विशेष सत्कार

पोलीसदलात झाली विशेष पदोन्नती, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक आंबेडकर चौकातील देशी कट्टा आपल्या विविध उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. याच देशी कट्ट्यावर शेखर मारोतराव वांढरे यांचा पदोन्नती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. शेखर वांढरे हे 1990 पासून पोलीस विभागात कार्यरत आहेत. गोपनीय शाखेत कार्य करीत असताना त्यांनी अनेक क्लिष्ट प्रकरणांचा छडा लावला. पोलीस दलातील गोपनीय शाखेत ते सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. संभाजी वाघमारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

मारेगाव तालुक्यातील खैरगाव हे त्यांचं मूळ गाव. जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे पथक, गुन्हे शाखा आणि गोपनीय शाखेतही त्यांनी दमदार कामगिरी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे सुरक्षारक्षक म्हणूनही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.वांढरे यांना पोलीस महासंचालक पदकदेखील मिळाले आहे. त्यांची अजून एक विशेष ओळख म्हणजे वारली चित्रकला. त्यांच्या वारली चित्रांची विविध ठिकाणी प्रदर्शने लागतात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वांढरे यांचा सत्कार करतेवेळी प्रदीप बोगगिनवार, राजाभाऊ पाथ्रडकर, संभा वाघमारे, बलदेव खुंगर, प्रमोद इंगोले, प्रमोद निकुरे, रवी बेलुरकर, भास्कर गोरे, भिकमचंद गोयनका, शरद मंथनवार, सुरेश बनसोड, नानाभाऊ कापसे, विजय भारानी, राजकुमार सागरे, आतीश सातोकर, धनू बोढे, अजय कापसे, नियाजभाई, सुरेश मांडवकर, प्रकाश कवरासे यांची उपस्थिति होती. त्यांच्या यशासाठी त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

Comments are closed.