कु. धम्मरूचा दारूंडेची गणतंत्र दिन पथसंचलनासाठी निवड

लोटी महाविद्यालयात सत्कार, सर्वत्र कौतुक

पुरुषोत्तम नवघरे, वणी :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रा.से.यो. विभागांतर्गत आयोजित पूर्व गणतंत्र दिन पथसंचलन निवड चाचणीतून लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीची रा.से.यो. विद्यार्थीनी कु. धम्मरूचा आनंद दारूंडे हिची राष्ट्रीय व राज्यस्तरीय पथसंचलन चाचणीसाठी निवड झाली आहे.

ही चाचणी १९ सप्टेंबर २०२५ रोजी विद्यापीठात पार पडली. आता नागपूर येथे २६ ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या पुढील फेरीत ती सहभागी होणार आहे.

या यशाबद्दल शि.प्र.मं.चे अध्यक्ष विजयजी मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्रजी बराडिया, सचिव सुभाषजी देशमुख, सहसचिव अशोक रावजी सोनटक्के व प्राचार्य यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले. तसेच डॉ. रेड्डी, रा.से.यो. जिल्हा समन्वयक डॉ. निलीमा दवणे, कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास जुनगरी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी तिचे कौतुक केले.

Comments are closed.