न. प. शाळा क्र. 8 मध्ये डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन

गुणवंत विद्यार्थीनीचा करण्यात आला गौरव

0

देवेंद्र खरबडे, वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 8 येथे दि. 28 जुलै ला डिजीटल वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू डोंगरे होते तर उद्घाटक म्हणून शिक्षण सभापती आरती वांढरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद निंबुळकर, धनराज भोंगळे उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेची माजी विद्यार्थीनी पायल पाल हिने 10वी मध्ये 88% गुण प्राप्त केल्याबद्दल गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक बंडूजी कांबळे व जेष्ठ शिक्षिका चित्रा बावणे यांचे कडून रोख 1000 रु चे बक्षिस देण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चित्राताई बावणे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक बंडूजी कांबळे यांनी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची पालकांना माहिती दिली. आरती वांढरे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले, शालेयपातळीवर मुख्याध्यापक राबवित असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी बहुसंख्येने पालक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.